अकोला विदर्भ

मनपा व्‍दारे शहरातील मुख्‍य बाजार पेठेतील अतिक्रमणे काढण्‍याची कारवाई करण्‍यात आली

अकोला-मनपा आयुक्‍त  संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये व उपस्थितीत स्‍थानिक गांधी चौक चौपाटी, मटका बाजार, भाजी बाजार, चिवडा मार्केट, किराणा बाजार, खारी बावडी, तिळक रोड, कॉटन मार्केट येथील आज सुध्‍दा कारवाई करण्‍यात आली. तसेच यावेळी अस्‍वच्‍छता पसरविणा-यांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली ज्‍यामध्‍ये होटेल कुज बिहारी यांचेवर 5 हजार रू. राजु शर्मा, तसेच हेमा एजेंसी यांच्‍यावर प्रत्‍येकी 500 रूपयांची दंडात्‍मक कारवाईत तसेच जुना कॉटन मार्केट येथील पंकज ट्रेडर्स यांचेकडे शासनाने बंदी घतलेल्‍या प्‍लास्‍टीक च्‍या सामग्रीचे साठा आढळून आल्‍यावर त्‍यांचेवर 5 हजार रूपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली. तसेच कुंदनमल व्‍यापारीमल यांच्‍या कडे मनपाचा व्‍यवसाय परवाना नसल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर 5 हजार रूपयांचीदंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे. सोबतच यावेळी कपडा बाजार येथील व्‍यावसायिकांचे बाजार परवानेंची तपासणी करण्‍यात आली.

          मनपा प्रशासनाव्‍दारा श‍हरातील सर्व व्‍यावसायिकांना आवाहन करण्‍यात येते कि, ज्‍या व्‍यावसायिकांनी अद्यापपर्यंत व्‍यवसाय परवाना घेतला नाही त्‍यांनी त्‍वरीत मनपाच्‍या बाजार विभागातून रितसर परवाना घेउनच व्‍यवसाय करावे तसेच ज्‍यांचे परवाना नुतनीकरण राहिले असतील त्‍यांनी नुतनीकरण करून घ्‍यावे, तपासणी दरम्‍यान मनपाचा व्‍यवसाय परवाना न आढळल्‍यास तसेच नुतनीकरण केलेला न आढल्‍यास संबंधीतांवर नियमानुसार दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येणार आहे.  

          या कारवाईत मनपा उपायुक्‍त प्रमोद कापडे, नगरसचिव व क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे  प्रशांत राजुरकर, मोटर वाहन विभागाचे शाम बगेरे, बाजार विभागाचे संजय खराटे, अतिक्रमण विभागाचे नरेंद्र घनबहादुर, प्रवीण मिश्रा तसेच आरोग्‍य निरीक्षक व अतिक्रण विभागातील कर्मचा-यांची उपस्थिती होती.  

error: Content is protected !!