कल्याण गुन्हा सामाजिक

आर्य गुरुकुल शाळेकडून विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे नवरात्रीत मातृपितृ पूजन तर दसऱ्यानिमित्त विद्यारंभ कार्यक्रम

कल्याण : हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाचे वेगळे महत्व असून प्रत्येक सणाच्या माध्यमातून एकत्र कुटुंब पद्धतीची शिकवण देण्याचा प्रयत्न असतो. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीचा स्वीकार करताना संस्कृती विस्मरणात जात असून हीच संस्कृती जपण्याचा प्रयत्न कल्याणातील आर्य गुरुकुल शाळेकडून केला जात आहे. नवरात्रीतील सप्तमीला सर्वच शाळामध्ये सरस्वती पूजन केले जाते मात्र अष्टमीला मातृपितृ पूजनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याचे काम शाळेकडून करण्यात आले. दरवर्षी शाळेत रंगणारा हा सोहळा यंदा करोना काळात शाळा बंद असल्यामुळे घराघरात रंगला तर पालक आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाईन हा सोहळा साजरा केला. प्रत्येक विद्यार्थ्याने अष्टमीच्या दिवशी सकाळी आई वडिलाचे पाद्यपूजन करत आशीर्वाद घेतले. तर दसर्या निमित्त रंगलेल्या लिटील आर्यन स्कूल मध्ये विद्यारंभ कार्यक्रमात देखील २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तीन ते पाच वर्षे वयाच्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनाचा शुभारंभ दसर्या दिवशी करण्याची हिंदू संस्कृतीत प्रथा असून या प्रथेचे पालन करताना वही, पुस्तके, पेन यासह घरातील सर्व हत्याराची आणि साधनाची पूजा करण्यात अली यानंतर रेती किंवा तांदूळ भरलेल्या ताटात विद्यार्थ्याचा हात पकडून लिहत शिक्षणाचा शुभारंभ केला जातो तर विद्यार्थ्याच्या जिभेवर सरस्वतीचा वास सदोदित राहावा यासाठी सोन्याच्या अंगठी मधात बुडवून या मधाने  विद्यार्थ्याच्या जिभेवर पालकांनी मंत्र लिहिला. दरवर्षी पंरपरेनुसार शाळेत साजरे केले जाणारे हे उपक्रम यंदा विद्यार्थ्यांनी घरातून पालकाच्या सहवासात घरातच साजरे केले तर शाळेच्या शिक्षकांनी या कार्यक्रमात ऑनलाईन हजेरी लावल्याचे संस्थेचे अध्यक्ष भरत मलिक यांनी सांगितले.

 

error: Content is protected !!