E-Paper उत्तर महाराष्ट्र जळगांव राजकीय

भाजपा भडगाव तालुक्याचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

भडगाव-प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर सुंदरबन फार्म येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबीराचे उद्घाटन जळगाव ग्रामिण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे,भडगाव ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. शिवाजी नरवाडे यांच्या हस्ते तसेच समारोप मा.आ. श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी लोकसभा विस्तारक सचिन पानपाटील, दिपक साखरे, तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील,प्रशिक्षण संयोजक सोमनाथ शालिगाम पाटील, सरचिटणीस अनिल पाटील हे उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबीरात दोन दिवसात १० विविध विषयांवर अनुभवी वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यात अमित साळुंखे,जळगाव सोशल मिडियाचा उपयोग, अजयजी भोळे – भारताची वैचारीक मुख्य धारा व आपली विचारधारा, विकासजी लोहार – आपला विचार परिवार, अशोकभाऊ कांडेलकर -पक्षाची कार्यपद्धती व संघटनात्मक रचनेतील भूमिका, शांतारामआबा पाटील- भाजपाचा इतिहास व विकास, आ. मंगेशदादा चव्हाण – राज्यातील राजकीय परिस्थीती व पक्षाची भूमिका, पोपटतात्या भोळे – मागील ६ वर्षातील अंत्योदय संबंधित प्रयत्न, उदयजी भालेराव – २०१४ नंतर भारतीय राजकारणातील बदल, तर मा.आ. श्रीमती स्मिताताई वाघ यांनी व्यक्तीगत विकास या विषयाची मांडणी करून प्रशिक्षण शिबीराचा समारोप केला.
याप्रसंगी तालुकाभरातून शिबीरासाठी दोन दिवसात १३० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

शिबीर यशस्वितेसाठी भडगाव शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

error: Content is protected !!