आरोग्य उत्तर महाराष्ट्र कल्याण गुन्हा जळगांव सामाजिक

भुसावाळातील भोलाणे बेकारीच्या पावांमध्ये बुरशी ; लेबल वर पॅकेजिंग डेट व बॅच नंबरही नाही

भुसावाळातील भोलाणे बेकारीच्या पावांमध्ये बुरशी ; लेबल वर पॅकेजिंग डेट व बॅच नंबरही नाही

रावेर – विजय पाटील

लेबल वर पॅकेजिंग डेट व बॅच नंबर तसेच एक्सपायरी डेट असणे बंधनकारक असतांना भोलाणे बेकारीने सर्व नियम धाब्यावर ठेवून शिळ्या व बुरशी युक्त पावांची विक्री सुरु ठेवली आहे.

लहान मुलांना पाव हि आवडीची वस्तू आहे. मुलांचा हट्ट पुरविण्यासाठी आपण त्यांना पाव देतो. हे पाव लहान मुले त्यांना समजत नसल्याने काहीही न बघता बुरशीयुक्त पावही आवडीने खातात. पाव बनविल्यानंतर ३ दिवसांच्या आत खाल्ले गेले तर ते चांगले असतात मात्र ३ दिवसानंतर त्यांना बुरशी लागते. यासाठी पावच्या पुड्याच्या लेबलवर पॅकेजिंग डेट व बॅच नंबर तसेच एक्सपायरी डेट असणे बंधनकारक आहे. यासाठी अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरणाने नियम लावून दिलेले आहे. मात्र या नियामंची सर्रास पायमल्ली होतांना दिसत आहे. भुसावळ येथील भोलाणे बेकारीचा माल रावेर तालुक्यातही विक्री होत आहे. मात्र कुठल्याही पावच्या पुड्यावर पॅकेजिंग डेट व बॅच नंबर तसेच एक्सपायरी डेट नाही. यामुळे ३ दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेले पावही ओळखता येत नाही व परिणामी या शिळ्या व बुरशी युक्त पावांची नागरिक खरेदी करीत आहे. यामुळे लहान मुलांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासने लक्ष देवून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!