E-Paper उत्तर महाराष्ट्र जळगांव

स्वच्छता कर्मचारी चे मनमानी कारभार, शिळे अन्न घेण्यास टाळाटाळ ! नागरिकांचे निवेदन

भडगाव -प्रतिनिधी

१) शिळे अन्न ओला कचरा म्हणुन घेण्यास स्वच्छता कर्मचारीची टाळाटाळ, नागरिकांना मनस्ताप

2) नियमाने कचरा घेण्याच्या जबाबदारीस केला जातोय नकार

3) माझे गाव माझा परिसर प्रतिष्ठान चे निवेदन

4) नगरप्रशासने लक्ष देऊन स्वच्छता कर्मचारी ना कराव्या सूचना सुज्ञ नागरिकांची मागणी

भडगाव येथील स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देण्यात आलेल्या घंटा गाड्या व त्यावरील चालक तथा कर्मचारी यांचा मनमानी कारभार चाललेला आहे. खोल गल्ली भडगाव येथे एका घरी छोटासा घरघुती कार्यक्रम होता व त्या ठिकाणी काही अन्न उरलेले होते त्या कारणाने ते आम्ही घंटा गाडीत ओल्या कचऱ्या मध्ये टाकण्यास गेलो असता तेथील गाडी चालक व बाकी कामगारांनी हे अन्न आंम्ही घेत नाही व टाकुपन देणार नाही असे सांगितले व ते शिळे अन्न असल्या कारणाने गुरांना टाकता येत नव्हते विनाकारण त्यांच्या आरोग्यास त्रास होईल म्हणून मग मी संबंधित घनकचरा ठेकेदारास फोन केला तर सांगितले की बाळद रोड येथे शिळ्या अन्नाची सोया केली आहे तिथे जाऊन टाकावे असे सांगितले नंतर माझी लोकप्रतिनिधी व नगरपरिषद कर्मचारी यांनीही समाधान कारक उत्तर दिले नाही.त्यावर आपल्या पालिकेकडून होणाऱ्या त्रासाबाबतीत समस्या व्यक्त केल्या व आपल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मिळालेला 48 वा नं. हा नावाला न ठेवता अजून 1 नं वर कसा येईल यासाठी चांगले काम करावे व गावातील जनतेला त्रास होणार माही याची दक्षता घ्यावी भविष्यात असे झाल्यास माझे गाव माझा परिसर प्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन करू असा इशारा दिला निवेदन देताना मुन्ना परदेशी,सोनू महाजन, शेख वकार व बाळा गायकवाड उपस्थित होते.

error: Content is protected !!