E-Paper उत्तर महाराष्ट्र जळगांव

रेशनिग 100% ऑनलाइन, मग रेशन चा काळाबाजार कसा ?

भडगाव/प्रतिनिधी
     महसूल विभागाच्या वतीने रेशनिग हे 100% झाल्याचे सांगितले जात असेल तरी रेशीनिग चा काळा बाजार अजून ही जोरात असल्याचे दिसून येते तालुक्यातील काही रेशन दुकानदाराकडे 1400 रुपये किंटल गहू 1600 रुपये किंटल तांदूळ सहज विकत दिला जात आहे परंतु ऑनलाइन जर झाले असेल यांच्या कडे रेशन उरते कसे  असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो
      यावर माहिती मिळाली असता कळते की काही दुकानदार हे ग्राहकांना उपलब्ध होणारे रेशन जर 25 किलो असेल तर त्यांचे थंब (अंगठा) घेऊन 15 किलो रेशन दिले जाते अश्या प्रकारे काही दुकानदार हे महिन्याला 8 ते 10 किंटल झोल करत असून आर्थिक दुर्बल घटकांना ना रेशना पासून वंचित करत आहेत
     ग्राहकांनी तक्रार केल्यास त्यांना त्याचे नाव कमी करण्यात येईल असे ही चर्चेत आहे अश्यावेळी जे मिळतंय ते आपल या भीतीने ग्राहक या संबंधी तक्रार करण्यास धास्तवत नाही
     प्रशासनाने आर्थिक दुर्बल घटकांच्या हक्कच्या रेशन चोरी वर लक्ष घालुन त्यांची होणारी लूट थांबऊन यांची वेळवेळी दप्तर तपासले जाऊन यांचे गोडाऊन ही  तपासले पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
error: Content is protected !!