जळगांव सामाजिक

आधार संस्था व लायन्स क्लब जळगाव कडून अमळनेर येथील शांती नगर आदिवासी गरीब महिला आणि युवती यांना विटामिन, कैल्शियम,झींक औषधी याचे वाटप

आबिद शेख ,अंमळनेर /प्रतिनिधि:-

आधार संस्था आधार आरोग्य प्रकल्प अंतर्गत लायनेस क्लब याचा कडून तेथील झोपड़पट्टी शांती नगर भागात जाऊन तेथील आदिवासी महिला आणि युवतींना कैल्शियम, विटामिन्स, झींक प्रत्येकी विटामिनच्या 10 गोळ्या, झींक च्या 10 गोळ्या, कैल्शियम च्या 20 गोळ्या अशी प्रत्येकी औषधीचे 90 सेट डॉ.विल्सन फार्मा यांचा कडून देण्यात आले.सर्व महिला युवतींनी खुशी ने उपस्थित राहुन गोळ्या समजावून घेतल्या.यासाठी
विशेष उपस्थिति ऑल इंडिया लायनेस प्रेसिडेंट डॉ.मंजिरी कुलकर्णी मैडम यांनी औषधीचे महत्व समजावून सांगितले. तसेच कोरोना काळात हया औषधीचा किती फायदा आहे हे सांगितले तसेच मल्टिपल मेडिकल चेकअप पर्सन जास्मिनजी भरूचा मैडम यांनी सर्व कार्यक्रम आयोजन करुन फार महत्वाचे सहकार्य केले.
तसेच आधार संस्थेच्या वैशाली शिंगांनें यांनी सर्व कार्यक्रमाचे आयोजन करुन दिले.
यावेळी ऑल इंडिया लायनेस प्रेसिडेंट मंजिरी मैडम, मल्टिपल मेडिकल चेयर पर्सन जास्मिनजी मैडम, जळ्गाव लायनेस प्रेसिडेंट प्रिती जैन , सोनल जैन ,आधार संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील व व्यवस्थापकीय संचालक रेणू प्रसाद , प्रकल्प व्यवस्थापक वैशाली शिंगाणे आदि उपस्थित होते

error: Content is protected !!