अकोला विदर्भ

अखिल भारतीय अनु.जाती जमाती रेल्वे कर्मचारी संघटना मुर्तिजापूर तर्फे संविधान दिवस साजरा-

 

मुर्तिजापुर प्रतिनिधी / भुषण महाजन

अखिल भारतीय अनु.जाती/जनजाती रेल कर्मचारी संघटना मुर्तिजापूर तर्फे संविधान दिवस भारतीय राज्यघटनेची प्रास्तविकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महामानव  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात आले व पुढील कार्यक्रम  कोरोना संक्रमणाचे पालन करून यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमच्या शेवटी 26/11 ला शहिंद पोलिस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री.नितीन क्यास्ते,  संघटनेचे अध्यक्ष श्री. सुनिल तायडे, सचिव श्री. रमेश जामनिक, कोषाध्यक्ष श्री.प्रशांत ढोकने, संदीप वानखडे , रवी वानखडे, किशोर सरदार, सतिश गायकवाड, अविनाश तेलगोटे आदीं च्या उपस्थितत कार्यक्रम पार पडला. त्याच बरोबर महामानवाची खरी किर्ती जनसामान्यांन पर्यंत पोहचण्याचा ध्यास संघटनेचे केला आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात जगातील सर्वांत मोठी राज्यघटना तयार करण्यात आली. आणि या देशाची किर्ती विश्वात  उंचावेल असा मान या देशाला डॉ. आंबेडकरानी मिळवून दिला. हा दिवस डॉ. आंबेडकरांमुळे आलाय यात तिळभर मात्र शंका नाही. या देशाचा राजा हा राणीच्या पोटातून नव्हे तर मताच्या पेटीतून जन्म घेऊ लागला. ते शक्य झालं संविधान निर्मितीमुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला, स्त्री, पुरुष भेद न राहता खाद्याला खादा लावून काम करण्याचा अधिकार मिळाला,  या देशाची पहिली महिला पंतप्रधान झाली, राष्ट्रपती, राज्यपाल, कलेक्टर  झाली, पहिली वैमानिक, पहिली अंतराळवीर झाली  ती भारतीय संविधानमुळे. अशा  संविधानाच्या निर्मितीचे खरे श्रेय जाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच.  त्यामुळे त्यांना विसरून कसे चालेल. तरी सुद्धा काही वाटसरू आपली वाट विसरून संविधानावर टिका करताना दिसतात. भारतीय संविधानाला बदलण्याची भाषा करतात.  अशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी  संविधान सभेत बोलताना सांगतात. या देशाचे संविधान कितीही चांगले असु द्या. त्याला चालवणारे लोक जर वाईट असतील तर संविधान वाईटच दिसेल. आणि याला चालवणारे लोक जर चांगले असेल तर संविधान चांगले दिसेल. फक्त चांगल्या लोकप्रतिनिधीं ची गरज या देशाला आहे. आज देशाला स्वतंत्र होऊन 73 वर्षे पूर्ण झालेत. पण या देशाच्या बळकट अशा संविधांमुळेच तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला आहे. मग या दिनाला विसरून कसे चालेल.

error: Content is protected !!