मुर्तिजापुर प्रतिनिधी / भुषण महाजन
जागो-जागी पाणी लिकेजमुळे लाखो लिटरच्या पाण्याचा नासाडा
20 वर्षा पासून मुर्तिजापुराचा पाणी प्रश्न काही गेल्या मिटत नाही आहे. बरेच पदाधिकारी येतात आश्वासने देतात. परंतू समाधानकारक कार्य आज पर्यंत पाहायला मिळाले नाही. जागो-जागी पाणी लिकेजमुळे लाखो लिटरच्या पाण्याचा नासाडा होत असून या समस्येने नागरिक हैराण झाले आहे. पाणी पुरवठा विभागाचे अभियंताना तर या समस्येकडे लक्ष दयायला वेळ नाही. सात दिवसातून एकदा येवून पाहणी करतात. नगर पालीकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे शहरात होणारा पाण्याचा पुरवठा आठ ते नठ दिवसांनी होत आहे. सदर पाणी पुरवठा 5 ते 6 दिवसाच्या आड व्हावा. मुर्तिजापुर शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या गोयनका नगर येथील टाकीवरील पाईपवर ३ ते ४ इंच मोठया प्रमाणात लिकेज असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्याचप्रमाणे शहरातील जुनी वस्ती येथे पाणीपुरवठा केल्या नंतर अनेक ठिकाणी मोठया असलेल्या लिकेजमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी कुणाला न सांगता काम करतात. 1 ते 2 दिवसाच्या कामाला 15 ते 20 लागतात. यामुळे पाणी पुरवठा व्यवस्थीत करणे संबंधीत कर्मचाऱ्यांना अडचणीचे होत आहे. 8 ते 10 दिवसाच्या पाणी पुरवठामुळे पाणी साठून ठेवावे लागते. या साठविलेल्या पाण्यामुळे मच्छरांचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होत आले. मुर्तिजापुर शहरात काही-काही ठिकाणची लहान मोठे झोन आहेत. तर कुठे तर झोनच नाही. आवश्यकता असून सुध्दा पाणीपुरवठा विभाग झोन करत नाहीत. प्रभाग क्र. 6 मध्ये टांगा चौक जुनी वस्ती, रोशन पुरा झोन व मलाई पुरा झोन वेगळे करण्यात यावे. यामुळे प्रभाग क्रमांक 6 जुनी बस्ती येथे प्रत्येक नागरीकांना पीण्याचे पाणी वेळेवर मिळेल. नगर पालिकेले वरिष्ठ अधिकारी आपल्या कर्तव्यावर वेळेवर येतच नाही. शिवाय आापल्या डयुटीवर चाटा मारतात. त्यामुळे फक्त कनिष्ठ कर्मचारी व शिपाई वर्गांनाच काम करावे लागते. तरी नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभाग यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी आदेश करण्यात यावा. तसेच कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक व्दारकाप्रसाद दुबे यांनी मा. जिल्हाधिकारी साहेबांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.