उत्तर महाराष्ट्र जळगांव राजकीय

रावेर तालुका सरपंच परिषदेच्या तालुकाध्यक्ष पदी सिंगतचे सरपंच प्रमोद चौधरी

रावेर तालुका सरपंच परिषदेच्या तालुकाध्यक्ष पदी सिंगतचे सरपंच प्रमोद चौधरी

रावेर

अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या रावेर तालुका अध्यक्षपदी सिंगत येथील प्रमोद लक्षमण चौधरी यांची निवड झाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी, उपाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यात सिंगत येथील सरपंच प्रमोद लक्ष्मण चौधरी यांची रावेर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी तालुकाध्यक्ष जगदीश पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या पदावर श्री. चौधरींना संधी देण्यात आली. यावेळी खिरवड सरपंच निळकंठ चौधरी, अटवाडे सरपंच गणेश महाजन, के-हाळे सरपंच राहूल पाटील, भाटखेड्याचे कैलास पाटील, विटवे येथील भास्कर चौधरी, उटखेड्याच्या सरपंच सविता गाढे, लियाकत जमादार, स्वाती परदेशी, भावना बोरोले, राहुल चौधरी, दिपाली कोळी, गजानन पाटील, धनराज कोळी, स्वाती वाघ, विनायक पाटील, लता बोंडे, सलीम तडवी आदी उपस्थित होते. बैठकीत सरपंचांना येणाऱ्या समस्यांबाबत व इतर विषयांबाबत चर्चा करण्यात आली. श्री. चौधरी यांच्या निवडीबाबत सर्व सिंगत वासियांनी आनंद व्यक्त केला असून अभिनंदन केले आहे. श्री. चौधरी यांचेवर कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!