Batmidar
उत्तर महाराष्ट्र जळगांव ताज्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मौलाना आझाद यांना अभिवादन

जळगाव / प्रतिनिधी 

मौलाना अबुल कलाम आझाद यांना पुण्यतिथी निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.  त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  पहिले जळगाव जिल्हाध्यक्ष स्व. विश्वनाथ भाऊ इंगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय. जी. महाजन सर मीनाक्षी चव्हाण यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील केलेल्या भरीव कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हा सेक्रेटरी अशोक पाटील, सलीम इनामदार, डॉ. रिज़वान खटीक, ममता तडवी, जुलेखा शाह, पीनाज़ फनिबन्दा, लता पाटील, उज्वला शिंदे,  रोहन, गणेश निंबाळकर, संजय चौहाण, अशोक लाड़वंजारी, अरविंद बंगाली, सुनील माळी, दिलीप महेश्वरी, जॉन अन्थोनी, जय प्रकाश महाडीक आदी उपस्थित होते.

Related posts

पाळधी महामार्ग पोलीस केंद्रात “हायवे मृत्युंजय दूत” या योजनेचे उद्घाटन संपन्न 

Batmidar

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेत असताना, नगरसेवक नवनाथ दारकुंडे

Batmidar

निंभोरा येथील विद्यार्थ्यांचे नाशकात स्नेहसंमेलन

Batmidar
error: Content is protected !!