Batmidar
ताज्या बातम्या दिल्ली राष्ट्रीय

हिंदूंचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर हिंदूंनी संघटित होणे, हाच एकमेव पर्याय ! – कपिल मिश्रा

दिल्ली / वृत्तसंस्था

  सद्यस्थितीत हिंदु संस्कृतीसभ्यतापरंपराइतिहासशौर्य याला अपमानित आणि समाप्त करण्यासाठी देशात प्रतिदिन नवीन षड्यंत्रे रचली जात आहेतदेशातील विविध राजकीय पक्षविविध क्षेत्रांतील लोक आणि बुद्धीजीवी वर्ग हिंदूंच्या सणउत्सवांची थट्टा करूनतसेच हिंदु धर्माला अपमानित करून हिंदूंमध्ये न्यूनगंड निर्माण करत आहेतहिंदूंना धर्म विसरण्यास भाग पाडले जात आहेतदेशातील हिंदु मंदिरांवर हल्ले केले जात आहेतराममंदिरासाठी निधी गोळा करणार्‍या रिंकू शर्मा या युवकाची देशाच्या राजधानीत चाकू भोसकून हत्या केली जातेया परिस्थितीत हिंदूंकडे हिंदुसंघटन’ हाच एकमेव पर्याय उरला आहेअसे न झाल्यास हिंदूंची ओळख पुसली जाईलत्यामुळे आपापसांतील भेदभाव विसरून आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी संकल्पशक्तीउर्जा आणि उत्साह यांनी भारलेल्या हिंदु बांधवांनी आता संघटित व्हायलाच हवेअसे आवाहन देहली येथील भाजप नेते तथा माजी आमदार श्रीकपिल मिश्रा यांनी केलेते हिंदु जनजागृती समिती आयोजित ऑनलाईन हिंदु राष्ट्रजागृती सभेत बोलत होते.

   सभेच्या आरंभी शंखनाद झाल्यावर हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पूनीलेश सिंगबाळ यांनी दीपप्रज्ज्वलन केलेसनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्रीआनंद जाखोटिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलाया ऑनलाइन’ सभेचा यूट्यूब’ आणि फेसबुक’ यांच्या माध्यमांतून 48,000 लोकांनी लाभ घेतला.

   या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पूनीलेश सिंगबाळ म्हणाले कीभारतात लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ आदी माध्यमांतून जिहाद’ चालू आहेतत्यांत इस्लामी नियमांनुसार चालू झालेल्या हलाल’ अर्थव्यवस्थेने भारताच्या अर्थव्यवस्थेला आव्हान दिले आहे. ‘हलाल’ नावाच्या फूड जिहादला जागरूक भारतियांनी बळी न पडता त्यावर बहिष्कार घातला पाहिजे. ‘धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली चर्च आणि मशिदी यांना हातही न लावणार्‍या राज्य सरकारांनी केवळ हिंदूंची मोठी मंदिरे आपल्यात नियंत्रणात घेतली आहेतसिनेमावेब सिरीज आदींच्या माध्यमांतून हिंदु धर्माचा अपमान केला जात आहेहे रोखण्यासाठी भारतात ईशनिंदाविरोधी कायदा’ लागू केला पाहिजे.

   या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्रीआनंद जाखोटिया म्हणाले कीकोरोना महामारीतून अजूनही संपूर्ण विश्‍व सावरलेले नाहीपुढे येणार्‍या कठीण काळात आत्मबळाची आवश्यकता आहे आणि हे बळ साधनेनेच निर्माण होईलछत्रपती शिवाजी महाराजमहाराज प्रताप यांसारख्या शूर योद्ध्यांनीही नामस्मरण करत ईश्‍वराकडून सामर्थ्य प्राप्त केले होतेयाप्रमाणेच आपणही साधना करून लोककल्याणकारी हिंदु राष्ट्रस्थापनेची पताका फडकावली पाहिजे.

   या सभेत धर्मवीरांनी दाखवलेली स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिकेतसेच बालसाधकांनी लघुपटातून राष्ट्ररक्षण आणि धर्मचरणाचे केलेले आवाहन लक्ष्यवेधी ठरलेया वेळी राष्ट्ररक्षण आणि धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स प्रदर्शनही दाखवण्यात आलेसभेच्या शेवटी हिंदु राष्ट्रस्थापनेसाठीतसेच हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी ठराव पारित करण्यात आलेसंपूर्ण वंदे मातरम्ने या सभेची सांगता झाली.

Related posts

प्रत्येक महिन्याला कमवा बक्कळ पैसा, बघा किती होणार फायदा?

Batmidar

वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून अजित पवार-फडणवीसांची चांगलीच जुंपली

Batmidar

दोन दुचाकींची धडक; तीन जखमी

Batmidar
error: Content is protected !!