Batmidar
ताज्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण सामाजिक

१०वी, व १२वी-च्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार

मुंबई / प्रतिनिधी

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. कारण ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड अनुकूल नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशापद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान या परीक्षा ऑफलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या परीक्षा ऑनलाईन होणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे.

दहावी, बारावीची परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे. राज्यात सध्या दहावीचे १६ लाख, तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी आहे.

काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही १६ फेब्रुवारी पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कोविडच्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Related posts

देगाव येथील कोरोना बाधित विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Batmidar

कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल यावलच्या पत्रकारांचा सत्कार

Batmidar

आत्याशी अनैतिक संबंध : भाच्याने घातल्या गोळ्या

Batmidar
error: Content is protected !!