Batmidar
उत्तर महाराष्ट्र जळगांव महाराष्ट्र राजकीय सहकार

बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा महिला सभापती – आ. अनिल दादा पाटील

बाजार समितीत महाविकास आघाडीचा पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात 

अमळनेर / प्रतिनिधी
बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा महिला सभापती विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे हा महिलांचा सन्मान आहे, असे उदगार आ. अनिल दादा पाटील बाजार समितीत संपन्न झालेल्या अशासकीय पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात केले. 

येथील बाजार समितीच्या सभागृहात अशासकीय सदस्य नियुक्त झालेल्या महाविकास आघाडीचा पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाच्या यावेळी अध्यक्षस्थानी आ. अनिल दादा पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील, सेवानिवृत्त सहा पोलीस आयुक्त मंगलसिंग पाटील, मारवडचे शांताराम पाटील, डॉ अनिल शिंदे, माजी बाजार समिती उपसभापती डॉ अशोक पाटील, शशिकांत पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील,
यावेळी आमदार अनिल पाटील, माजीं आमदार साहेबराव साहेबराव पाटील, डॉ अनिल शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात येऊन बाजार समितीच्या कारभाराची सूत्रे देण्यात आले. नियुक्ती पत्रे देण्यासाठी मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, बी के सूर्यवंशी, विजय पाटील, संभाजी लोटन पाटील, किरण भालेराव पवार, एस टी महामंडळाचे प्रदेश कामगार संघटनेचे नेते एल टी पाटील, भाईदास सोनू अहिरे, राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष सुरेश विक्रम पाटील, जितेंद्र प्रेमसिंह राजपूत यांना पदभार देण्यात आला. यावेळी प्रस्ताविक डॉ राजेंद्र पिंगळे यांनी केले.

मुदत संपलेल्या संस्थांवर  महाविकास आघाडीचा प्रतिनिधित्व प्रस्ताव देण्याचे प्राधान्य आ. अनिल पाटील यांनी केले. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर सर्व सदस्य कार्यकर्त्यांना सहकार्य करू असे आश्वासन संचालिका तिलोत्तमा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

खरं तर प्रशासकाची जबाबदारी महत्वपूर्ण असते. बाजार समिती स्थापन होऊन 83 वर्ष झालेत. या खुर्चीवर पहिली महिला बसली आहे. याची इतिहासात कायम नोंद राहील. सहकार क्षेत्रातील अनुभव पाहता ही नावे शेतकी संघावर एक टीम उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही कार्यकर्ते शेतकी संघाला न्याय देतील, त्यांची निवड करण्यात येईल. येणाऱ्या काळात निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यांना फायदा होईल असे काम करा. बाजार समितीचे चित्र बदलेले होते. टोकन घोटाळा होऊन सचिव निलंबित झाले. त्यामुळे हा ठपका बदलत बाजार समिती चेहरा संपूर्ण महाराष्ट्रात सुधारण्याचा प्रयत्न करा. शेतकरी व्यापारी हमाल मापाडी या तीन घटकांना एकत्र करून तुम्ही सर्व बाजू ऐकून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकतात. बाजार लिलावात वादविवाद म्हणजे वांदा निर्माण होतो.  तेव्हा ते वादविवाद कसे टाळता येतील यासाठी जबाबदारी पार पाडायची आहे. दोन्ही बाजू समजून प्रयत्न करावा.असे आवाहन आ.पाटील यांनी केले.

तसेच ग्रामीण भागात शहरी भागात सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केले आहे. त्याचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन केले. 50 पेक्षा जास्त नागरिकांमध्ये विवाह सोहळे पार पाडले. आता 50 च्या आत विवाह सोहळे पार पाडण्यासाठी आपण कार्यकर्त्यांनी प्रमुख भूमिका घेऊन प्रयत्न करावेत. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Related posts

लोंढे येथील तरूणाची दुचाकी लांबविली

Batmidar

व्याधी दूर करण्यासाठी संगीत उपचार पद्धती प्रभावी

Batmidar

आदिवासी उमेदवारांची विशेष भरती मोहिम सुरु करण्याबाबतचे तहसीलदारांना निवेदन

Batmidar
error: Content is protected !!