Batmidar
महाराष्ट्र मुंबई राजकीय

माझी, कुटुंबियांची बदनामी थांबवा – संजय राठोड

वाशिम / प्रतिनिधी 

माझं आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी पहिली प्रतिक्रिया वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर दिली आहे. वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मौन सोडले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात घाणेरडं राजकारण होत  आहे. माझी, कुटुंबियांची बदनामी थांबवा, अशी विनंती संजय राठोड यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

चौकशीतून सत्य समोर येईल मला आज काही बोलायचं नाही, असं देखील यावेळी ते म्हणाले. यापुढेही पूर्वीसारखे  काम सुरूच राहणार, मी माझ्या मुंबईच्या घरातून काम करत होतो. माझं कुटूंब सांभाळत होतो.
पुजा चव्हाण मृत्यूचं राजकारण हे घाणेरडं, चुकीचं आणि निराधार असून मला एका घटनेमुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करु नका. आता काहीही बोलायचं नाही.
पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचं सर्वांना दु:ख आहे , त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Related posts

जिल्ह्यात कोरोनाचे 279 रुग्ण आढळले

Batmidar

साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का, जिच्यापुढे बाईची इज्जतच राहिली नाही : चित्रा वाघ

Batmidar

मुंबई पोलिसांचे शौर्य , 77 वर्षीय महिलेच्या हत्याप्रकरणी चार दिवसांमध्ये आरोपींच्या मुसक्या बान्धल्या

Batmidar
error: Content is protected !!