Batmidar
उत्तर महाराष्ट्र जळगांव ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी रेल्वे, परिवहनला कार्यवाहीचे आदेश

जळगाव / प्रतिनिधी

कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी तत्काळ कठोर कार्यवाहीचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न व औषध प्रशासन आणि रेल्वे विभागास दिले. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी या विभागाच्या प्रमुख अधिकार्‍यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली.

श्री राऊत म्हणाले की बाजार समितीमध्ये सकाळी घाऊक खरेदीदाराबरोबरच किरकोळ खरेदीदार गर्दी करतात. ती रोखण्यासाठी सहकार विभागाने कडक कार्यवाही करावी तसेच परिवहन विभागाने विनामास्क प्रवाशी आढळल्यास कार्यवाही करावी. एस. टी. महामंडळाच्या तसेच खाजगी बस, रिक्षांमधून जादा प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवाशी मास्क न लावता प्रवास करतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी, रेल्वे विभागाने अमरावती, अकोला, मुंबई, पुणे व नागपूर या जिल्ह्यातून येणार्‍या प्रवाशांची माहिती उपलब्ध करुन द्यावी. तसेच रेल्वे गाडीतून प्रवास करतांना सोशल डिस्टन्सींग पाळले जात आहे की, एकाच ठिकाणी गर्दी करुन प्रवासी प्रवास करीत आहे हे तपासावे, अन्न व औषध विभागाने गर्दी होणार्‍या उपहारगृहात तपासणी करावी, गर्दी होणारे ढाब्यांवर तपासणी करावी.

Related posts

काँग्रेसवर असे आरोप झाले, मंत्रीच काय ……तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिले : नाना पटोले

Batmidar

कर्णधार म्हणून कोहली केवळ एक शतक दूर; रिकी पॉटिंगलाही टाकणार मागे

Batmidar

साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का, जिच्यापुढे बाईची इज्जतच राहिली नाही : चित्रा वाघ

Batmidar
error: Content is protected !!