Batmidar
उत्तर महाराष्ट्र जळगांव ताज्या बातम्या महाराष्ट्र

नगराध्यक्षांच्या दालनात 2 रोजी आत्मदहन करणार – पिंटू ठाकूर

भुसावळ / प्रतिनिधी 

एकहाती सत्ता असलेल्या पालिकेतील भाजपा सत्ताधार्‍यांना सत्ताधारी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी विकासकामे होत नसल्याने आत्मदहनाचा इशारा दिल्याने भुसावळच्या राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील कालिमाता मंदिर, हनुमान मंदिर, बौध्द विहार, मशीद परीसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, राष्ट्रीय महामार्ग ते गौरक्षण पर्यंत मुख्य गटारीचे बांधकाम, बौध्द विहारासमोरील सभा मंडप अशा विविध विकासकामांना मान्यता करीता नगराध्यक्ष रमण भोळे यांचे फार्म नंबर 4 वर स्वाक्षरी लागते मात्र ते स्वाक्षरी करीत नसल्याने नगराध्यक्षांच्या आडदांड, कपटी व खुनशी प्रवृत्तीला कंटाळून विकास कामांसाठी 2 मार्च रोजी नगराध्यक्षांच्या दालनात स्वत:च्या अंगावर रॉकेल, पेट्रोल टाकून आत्मदहन करेल, असा इशारा नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी दिल्याने भुसावळात खळबळ उडाली आहे.

नोव्हेंबरपासून स्वाक्षरीची प्रतिक्षा
ठाकूर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार नोव्हेंबर 2020 पासून विकासकामांची प्रकरणे नगराध्यक्ष भोळे यांच्या तांत्रिक मंजूरीसाठी नंबर 64 च्या फार्मवर स्वाक्षरी करीता प्रलंबीत आहेत. या प्रकरणांवर स्वाक्षरीसाठी भोळे यांना वारंवार विनंती केली. तसेच मुख्याधिकारी तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्विय सहाय्यकांच्या मार्फत विनंती करुनही ते स्वाक्षरी केलेली नाही.

Related posts

महाराष्ट्र-केरळमध्ये कोरोना वाढला, युपी सरकार झाले अलर्ट

Batmidar

वडिलांकडून चिमुकलीची हत्या

Batmidar

नैतिकतेच्या आधारावर राठोडांचा राजीनामा : संजय राऊत

Batmidar
error: Content is protected !!