उत्तर महाराष्ट्र जळगांव मनोरंजन महाराष्ट्र

सिनेमा गृहांना ५० टक्के प्रेक्षकांची परवानगी द्यावी

चित्रपटगृह चालकांची पत्रकार परिषदेत मागणी
जळगाव / प्रतिनिधी

कोरोनामुळे चित्रपटगृहांचे व्यवसाय ठप्प झाले असून आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने ५० टक्के प्रेक्षकांसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी चित्रपटगृह चालकांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केली.
सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये, मंगलकार्यालये गर्दीचे ठिकाणे बंद केली. दरम्यान, सुरूवातीला लॉकडाऊनच्या काळात चित्रपटगृह व्यवसायिकांनाही मोठा फटका बसला होता. ऑक्टोबर २०२० पासून नियमानुसार ५० टक्के सवलत असल्यामुळे ग्राहकांची उपस्थितीची परवानगी देण्यात आली होती. सध्या कोरोनामुळे सर्व धंदे बंद असल्यामुळे चित्रपटगृह चालविणे अवघड झाले आहे. सिनेमागृह सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी चित्रपट संघाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी राजकमल टॉकीजचे महेंद्र लुंकड, पीव्हीआर सिनेमागृहाचे आकाश सिंग, आयनॉक्सचे वैभव शहा, अशोक थिएटरचे इंद्रवर्धन त्रिवेदी आदींनी भेट घेतली. यासंदर्भात येत्या सात दिवसात निर्णय घेवू असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

error: Content is protected !!