मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन
अकोला जिल्हयातील वाढत्या कोरोना ग्रस्
त रुगणांच्या संख्ये मध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता मा. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अंमलबाजवणी करण्याचे जिल्हा प्रशासन तथा तालुक्यातील स्थानिक प्रशासनाला आदेश दिले आहेत. मुर्तिजापुर शहरामध्ये प्रसिध्द मंगळवार आणि शुक्रवार आडवडी बाजार भरतो. मंगळवारी भरत असलेल्या आठवडी बाजारामध्ये स्थानिक प्रशासनाकडून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याकरिता मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात येत अंमलबजावणी झुकारुन नागरिकांनी आदेशाची पायमल्ली करण्याचे भयावह वास्तव मंगळवारी भरलेल्या बाजारामध्ये पाहावयास मिळाले. नागरिकांच्या या बेताल वर्तुणुकीमुळे स्थानिक प्रशासन सुध्दाने हात जोडले. कोरोनाला काहीही न जुमानता नागरिक मनमौजी वृत्तीने वावरतांना आढळून आले. बाजारामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या मोजणे सुध्दा कठीण होते. शासनाच्या नियमांना डावलून मनमोकळे फिरणारे वयोवृध्दांना प्रशासनाक डून कुठलेही बंधन नसल्याचे आढळून आले. जमावबंदीचा आदेश असतांनाही कोणतेही बंधन नसल्याच्या वृत्तीने नागरिक बिनधास्त वावर होते. अशा परिस्थितीमुळे कोरोना रुग्ण संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी तुम्ही तुमच्या जीवाचे रखवाल म्हणून वावरा व आपले तृथा आपल्याचे परिवाराचे कोरोना पासून संरक्षण करा. असे म्हणण्याची वेळ स्थानिक प्रशासनावर आली आहे.