अकोला विदर्भ

घरकुल परिसरातील अनेक प्रश्न कधी लागणार मार्गी

घरकुल कॉलनी मध्ये टँकर चालु करण्याची श्री. चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्यांक संस्थेची मागणी

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन

अँकर:-येथील जुनी वस्ती परिसरातील मागील १० वर्षा पासून गाजत असलेल्या नविन घरकुल परिसरा मधील समस्यांचे गाऱ्हाणे नावापुरते प्रशासनाकडून नागरिकांचे समाधान करण्यात येते.मे-जुन महिन्यामध्ये रस्त्यावरील लाईट व घरगुती मीटर करिता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या संचारबंदीच्या कारणाने सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांनी घरुनच आंदोलन उभे केले होते.

व्हिडीओ:-सोशल मिडियामुळे 15 दिवसातच रस्त्यावरील लाईट लावण्याचे काम कसे थातुरमातुर सुरु करण्यात आले. त्यामध्ये काही रस्त्याकडे डोळेझाक करण्यात आली. परंतू अवघ्या दोन महिन्यातच रस्त्याच्या लाईट बाबत घरकुल वासियांच्या आशा पाण्यात मिळाल्या. घरकुल परिसरातील बऱ्याच लाईन मधील रस्त्यावरील लाईट बंद स्थिती मध्ये आहेत. तसेच कुठे – कुठे तर 2 लाईट मागे 1 लाईट बंद आहे.त्यानंतर पावसाळया मध्ये विषारी  प्राण्यांपासून जीवाला असलेले भय बाळगून ते पण दिवस घालवले.आता पण दिवस तसेच चालले.घरी राहणाऱ्या महिलांना तर त्रास होतोच. परंतू बाहेर कामाकरिता जाणाऱ्यांना रात्री येतांना अंधारातून रस्ता काढत यावे लागते. त्यामध्ये त्यांचा रस्ता अडवतात रस्त्यावरील मोकाट श्वाने. सायंकाळी 6 नंतर घरकुल कॉलनी मध्ये लाईट नसलेल्या रस्तयांवर अंधाराचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे महिलांना व मुलींना तर बाहेर निघता पण येत नाही. ज्या लाईन मध्ये लाईट नाही तेथे लाईट लावण्यात यावे व बंद असलेले रस्त्यावरील लाईट त्वरीत सुरु करण्यात यावे. अशी मागणी घरकुल वासियांनी केली आहे.  तसेच सध्या स्थितीत मध्ये उन्हाळयाची चाहूल लागली असून पाण्याचा बिकट प्रश्न उदभवला आहे. त्यातच पुन्हा लॉकडाऊन मु्ळे नागरिकांना चारही बाजूंना समस्यांनी घेरले आहे. या समस्यांबाबत श्री. चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्यांक संस्थेने वेळोवेळी ही पाठपुरावा केलेला आहे.

Total Page Visits: 37 - Today Page Visits: 1
error: Content is protected !!