मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊन ला मुर्तिजापुर वासियांनी उत्सर्फुत प्रतिसाद दिला. मा. जिल्हाधिकारी यांनी अकोला, अकोट, मुर्तिजापुर आणि मध्ये कोरोना रुग्णां मध्ये झपाटयाने होणारी वाढ लक्षात घेता हे तिनही प्रतिबंधक क्षेत्र रविवारी प्रशासनाला तसेच नागरीकांना दिलेल्या सुचनांनुसार घोषित केले. तसेच दि. 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2021 पर्यंत स्थानिक प्रशासनाला कडक लॉकडाऊन बाबत आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाचे स्थानिक प्रशासनाने काटेकोरपणे पालन करित मुर्तिजापुर शहरामध्ये दुपारी 3.00 वाजता नंतर संपूर्ण बाजारपेठ बंद स्थितीत आढळून आली. मुर्तिजापुरातील स्टेशन विभाग व जुनी वस्ती यांना जोडणारा एकमेव भगतसिंग चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करित कडक निर्देश देण्यात आले. रेस्ट हाऊस जवळील अकोला नाक्यावर, हिरपुर नाका, दर्यापुर उडडाणपुल, कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील स्मशानभुमि, आसरा रोड, भटोरी नाका, चिखली गेट, तसेच शहरातील काही वर्दळीच्या ठिकाणी बॅरीकेट लावून कडक अंमलबजावणी करण्यात आली.