Crime उत्तर महाराष्ट्र जळगांव महाराष्ट्र

मध्यप्रदेशातील महिलेवर भुसावळात अत्याचार

भुसावळ / प्रतिनिधी
शहरातील दगडी पुलाजवळून लाल रंगाच्या मोटरसायकल वर अज्ञात इसमाने
मध्यप्रदेशातील एका महिलेला बसवून
 जळगांव रोड कडे वाय पॉईन्ट जवळील पेट्रोल पंप व उड्डाण पुलाकडून जळगावच्या दिशेने
निर्जनस्थळी नेऊन अंधाऱ्यात मोटरसायकल थांबविली. त्या अज्ञात इसमाच्या तावडीतुन महिला पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना अज्ञात त्याने दि.२२
फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० ते ११.३० वाजेच्या दरम्यान महिलेस चापटा – बुक्यांनी मारहाण केली व खालीपाडून तिच्या इच्छेविरुद्ध अंगावरील कपडे फाडून शारीरिक अत्याचार केला. यानंतर अज्ञात त्याने
मोठा दगड उचलून महिलेच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न करीत असतांना महिलेने 
त्याच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी
बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ८२/२०२१ भादवि कलम ३६३, ३७६, ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनास्थळी पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास बाजारपेठ ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, पोना किशोर महाजन, स. फौ. सुनील सोनवणे, पोहेकॉ अनिल पाटील करीत आहे.
error: Content is protected !!