Crime आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव

जळगावातील डी मार्ट सील ; कोरोना नियमांचे उल्लंघन

जळगाव / प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी जळगावातील पाचोरा रोड वरील सुप्रसिद्ध डी मार्ट मंगळवारी महापालिका प्रशासनाने सील केले आहे.

 कोरोना रुग्णाची संख्या जळगांव शहरासह जिल्ह्यात झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. तसेच सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरातील मार्केट व मॉल मध्ये गर्दी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सह गुन्हे दाखल करण्यात येत आहे. डी मार्ट मधील गर्दीचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डी मार्टवर धाड टाकली. यात गर्दीसह कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यामुळे संपूर्ण डी मार्ट सील करण्यात आले आहे.

error: Content is protected !!