दिल्ली राष्ट्रीय

दिल्लीतील भाजी बाजारात भीषण आग ; 32 जणांचा होरपळून मृत्यू

 

दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील भाजी बाजार परिसरात रविवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत 32 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी ५० हून अधिक जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.

राणी झासी रोडवरील भाजी बाजार भागातील घरांना रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीची घटना समजताच अग्निशामक दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी पोहचून त्यांनी घरात अडकलेल्या सुमारे ५० जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले. अरुंद गल्ल्या आणि सकाळीच लागलेल्या आगीत अनेक जण झोपेत होते. त्यामुळे आग व धुरामुळे त्यांना घरातून बाहेर पडता आले नाही. अनेकांचा भाजून तसेच गुदमरुन मृत्यू झाला.

आगीतून बाहेर काढलेल्या लोकांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या आगीत किमान २०जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या २५ पर्यंत वाढू शकत असल्याचे येत आहे. आता या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असल्याचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुनिल चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसेच घटनेतील मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना 10 लाख तर जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल असे देखील त्यांनी जाहीर केले.

error: Content is protected !!