‘ज्यांना स्वप्न बघणे चांगले वाटते, त्यांना रात्र छोटी वाटते, अनुपम खेर अशी पोस्ट चर्चेत 

मुंबई l प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. ते नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात.

नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर प्रेरणादायी विचाराच्या ओळी शेअर केल्या आहेत. अनुपम खेर यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर काही प्रेरणादायी विचार लिहिले आहेत. ‘ज्यांना स्वप्न बघणे चांगले वाटते, त्यांना रात्र छोटी वाटते. तर ज्यांना स्वप्न पूर्ण करणं चांगलं वाटतं त्यांना दिवस छोटा वाटतो,’ अशा ओळी असलेला फोटो अनुपम खेर यांनी शेअर केला आहे.

त्यांनी शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाखो कमेंट्स दिल्या आहेत. यावर नेटकऱ्याने लिहिले की, ‘तुम्ही असंच लिहित रहा, दिवस चांगला जातोय,’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, ‘पण आश्चर्याची गोष्ट आहे की दोघांचा समान वापर कसा करायचा हे कोणालाच माहिती नाही’ असेही सांगितले आहे. ‘सर तुम्ही खूप सुंदर ओळी लिहिल्या आहेत.’ असेही एका युजर्सने म्हटले आहे. अनुपम खेर यांच्या या पोस्टला दहा हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे.

बातमीदारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

1 Comment
  1. Sonam Patil says

    For those who like to dream, the night seems short, in the post discussion like Anupam Kher

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

x
error: Content is protected !!