आज अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा वाढदिवस

मनोरंजन

आज बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा वाढदिवस आहे. शर्मिलाजींनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या खास निमित्त त्यांच्याशी संबंधित गोष्टी जाणून घेऊया…

७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर आज ७७ वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांनी सत्यजित रे यांच्या ‘अपूर संसार’ या बंगाली चित्रपटातून आपल्या सिनेमाच्या कारकिर्दीची सुरुवात केली.

त्यानंतर, त्यांनी ‘काश्मीर की कली’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. यात मुख्य नायकाची भूमिका शम्मी कपूर यांनी साकारली होती.

दिवंगत अभिनेते राजेश खन्नासोबत शर्मिला यांची जोडी खूप हिट ठरली. दोघांनी पहिल्यांदा १९६९ मध्ये ‘आराधना’ मध्ये एकत्र काम केले होते. यानंतर ही जोडी ‘अमर प्रेम’, ‘सफर’, ‘मालिक’, ‘छोटी बहू’, ‘राजा रानी’ या चित्रपटात दिसली. यानंतर शर्मिला यांनी राजेश खन्ना व्यतिरिक्त शशी कपूरसोबत सर्वाधिक चित्रपट केले होते.

शर्मिला ह्या त्याकाळी बिकिनी परिधान करणारी पहिल्या अभिनेत्री होत्या. ‘एन इव्हनिंग टू पॅरिस’ या चित्रपटात त्यांनी स्विमसूट घातला होता तसेच त्यांनी १९६६ मध्ये फिल्मफेअर मॅगझिनसाठी बिकिनी घालून फोटोशूट केले होते. त्यावेळी या फोटोशूटची बरीच चर्चा झाली होती.

शर्मिलाजींनी भारतीय संघाचे कर्णधार मन्सूर अली खानशी विवाह केला. दोघांनी पहिल्याच भेटीत एकमेकांना पसंत केले होते. मन्सूर यांनी ४ वर्षे शर्मिलाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर शर्मिला यांनी लग्नाला होकार दिला. दोघांच्या घरच्यांना लग्नासाठी पटवणे सोपे नव्हते. कारण शर्मिला यांची फिल्म इंडस्ट्रीत एक बोल्ड इमेज होती, त्यामुळे पतौडी कुटुंब त्यांना सून बनवण्यास कचरत होते. मन्सूरसोबत लग्न करण्यासाठी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.

बातमीदारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

x
error: Content is protected !!