प्रभासच्या चित्रपटाच्या ट्रेलरचे चाहत्यांकडून अनावरण होणार

मनोरंजन

सुपरस्टार प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात प्रभाससोबत पूजा हेगडे दिसणार आहे. चित्रपटासाठी निर्माते जोरदार तयारी करत आहेत. ‘राधे श्याम’ च्या ट्रेलरच्या रिलीजच्या वेळी काहीतरी नवीन आणि धमाकेदार घडणार आहे.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासात पहिल्यांदाच चाहते एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करणार आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील चाहत्यांसाठी पहिल्यांदाच ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा. २३ डिसेंबर, रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद.’

निर्मात्यांच्या या घोषणेनंतर चाहते खूप उत्सुक आहेत. आत्तापर्यंत ‘उड जा परिंदे’ आणि ‘आशिकी आ गई’ या चित्रपटातील ही दोन गाणी रिलीज झाली आहेत आणि दोघांनाही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित या चित्रपटात १९७० च्या दशकातील युरोपमध्ये दाखवण्यात आला असून या चित्रपटात प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त भाग्यश्री, कृष्णम राजू, प्रियदर्शी आणि सचिन खेडकर हे कलाकार आहेत.

एका वृत्तानुसार हा चित्रपट ३५० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला असून चित्रपटाचे शूटिंग हैदराबाद, इटली आणि जॉर्जियामध्ये झाले आहे. पुढील वर्षी १४ जानेवारीला ‘राधे श्याम’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बातमीदारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

x
error: Content is protected !!