भारतीय वाहन बाजारपेठेत ‘या’ कंपनीची नवीन बाईक लाँच

ऑटो

यामाहा मोटर इंडियाने सोमवारी आपली नवीन मोटरसायकल सादर केली आहे. या नवीन मॉडेलचे नाव यामाहा FZS-Fi DLX असे आहे. यातील २०२२ FZS-Fi ची प्रारंभिक किंमत रु. १,१५,९०० तर नवीन FZS-Fi DLX ची किंमत रु. १,१८,९०० आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम दिल्लीच्या आहेत.

कंपनीने सांगितले आहे की, नवीन FZS-Fi ‘द कॉल ऑफ द’ ब्लू उपक्रमांतर्गत सादर करण्यात आली आहे. नवीन मॉडेलमध्ये स्टाइलिंगसोबतच फिचर्सही रिफ्रेश करण्यात आले आहेत.

दोन्ही नवीन यामाहा FZS-Fi मॉडेल कंपनीच्या ब्लूटूथ सक्षम कनेक्ट एक्स एपसह येतात तसेच यात एलईडी टेल लाइट्स मिळतील.

FZS-Fi DLX प्रकारात एलईडी फ्लॅशलाईट देखील मिळेल, जो मेटॅलिक ब्लॅक आणि मेटॅलिक डीप रेड आणि सॉलिड ग्रे या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. यात रंगीबेरंगी एलोय व्हील्सही उपलब्ध आहेत.

२०२२ यामाहा FZS-Fi च्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यात १४९ सीसीचे इंजिन आहे जे ७,२५० वर १२.४ पीएस पॉवर जनरेट करू शकते तसेच ही मोटरसायकल ५,५०० आरपीएम वर १३.३ पीक टॉर्क निर्माण करू शकते.

बातमीदारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

x
error: Content is protected !!