अहिरवाडी कर्जोद रस्त्यावर नवजात अर्भक सापडले

रावेर प्रतिनिधी

तालुक्यातील अहिरवाडी कर्जोद रस्त्यावर स्त्री जातीचे नवजात बाळ काटेरी झुडुपात टाकून फेकलेले मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.

बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास रस्त्यावर जाणा-या व शेतात काम करणा-यांना बाळाचा रडण्याचा आवाज आल. आवाजाच्या दिशेने गेले असता स्त्री जातीचे सुमारे ७-८ दिवसांपूर्वी जन्मले बाळ दिसले. भाजपचे युवा कार्यकर्ते व पंचायत समितीच्या उपसभापती यांचे पती संदीप सावळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पि.के.महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, अरुण शिंदे यांनी या बाळाला रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे बाळावर उपचार वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत चव्हाण यांनी उपचार केले. बाळाची प्रकृती चांगली आहे. पुढील उपचारासाठी बाळाला जळगाव पाठविण्यात आले आहे.

बातमीदारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

x
error: Content is protected !!