महासभेत भाजपचे घुमजाव करीत ४२ कोटींच्या कामाला सहमती

जळगाव । प्रतिनिधी

शहरातील विविध विकासकामांच्या मंजुरीसाठी आयोजित मनपाच्या विशेष महासभेत भाजपकडून ४२ कोटींच्या कामाला विरोधाची शक्यता होती. दरम्यान, महासभेत भाजपने घुमजाव करीत ४२ कोटींच्या कामाला सहमती दर्शवल्याने तो विषय मंजूर करण्यात आला आहे.

महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या विशेष महासभेला मनपा सभागृहात सुरुवात झाली आहे. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित आहेत.

जळगाव शहरातील विविध विकासकामांसाठी १०० कोटींचा विशेष निधी मंजूर झाला होता. १०० कोटींपैकी ४२ कोटींची कामे निश्चित झाली असून आज झालेल्या महासभेत तो विषय मांडण्यात आला. ४२ कोटींच्या कामात बऱ्याच नगरसेवकांची कामे घेण्यात आलेली नाही त्यामुळे उर्वरित ५८ कोटींच्या कामात भाजप नगरसेवकांना पूर्णपणे विश्वासात घेऊन त्यांची कामे समाविष्ट करून घ्यावी, अशा सूचना नगरसेविका ऍड.शुचिता हाडा यांनी मांडली. सर्वांना सोबत घेऊन सर्वांना समान निधी देण्याची आमची भूमीका आहे. आधी शहारातील रस्त्यांचा विषय महत्वाचा आहे. आता रद्द केलेली कामे पूढे घेण्यात यावी अशी मागणी नगरसेवक राजेंद्र घुगे यांनी मांडली.

बातमीदारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

x
error: Content is protected !!