महिला आयएएस अधिकाऱ्याची बॅग चोरणारा जाळ्यात

जळगाव । प्रतिनिधी

बराेनी – अहमदाबाद एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिला आयएएस अधिकाऱ्याची बॅग चोरणायची घटना ८ रोजी पहाटे २:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर १२ तासातच खंडव्यातून चोरट्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून बॅग जप्त केली, त्यात लॅपटॉपसह एक लाख ७५ हजारांचा मुद्देमाल होता. संशयिताने घातलेली मंकी कॅप आणि मास्कवरून त्याची ओळख पटली.

बराेनी-अहमदाबाद एक्स्प्रेसच्या बी-३ डब्यातील सीट ७१ वरून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी कृती राज (रा.लालबहादूर शास्त्री अकादमी, देहरादून, मसुरी) प्रवास करत हाेत्या. त्यांची लॅपटाॅप असलेली बॅग चाेरीला गेली होती. संशयित राहुल रोकडे (रा.खंडवा) हा गाडीत खंडव्यातून बसला हाेता, बॅग चोरल्यानंतर तो भुसावळ जंक्शनवर उतरला. चोरीची घटना लक्षात येताच प्रीती राज यांनी भुसावळ जीआरपी पाेलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.

याप्रकरणी पाेलिस अधीक्षक माेक्षदा पाटील व आरपीएफ आयुक्त क्षितीज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक विजय घेरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ भुसावळ जंक्शनवरील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी गाडीच्या बी-३ या डब्यातून उतरलेल्या प्रवाशाच्या हातात बॅग दिसली. त्याने मंकी कॅप घालून मास्क लावलेला होता. त्याच वर्णनावरून शोध घेतला.

बातमीदारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

x
error: Content is protected !!