कजगावच्या गल्लीबोळात डुकरांचा हैदोस

कजगाव l प्रतिनिधी

कजगाव ता. भडगाव येथे डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्यांचा मुक्त वावर कजगाव ग्रामस्थांना डोकेदुखीचा विषय ठरत आहे. गावातील जुनेगाव, नवेगाव परीसरातील सर्वच ठिकाणी डुकरांनी अक्षरक्ष उच्छाद मांडल्याचे चित्र दिसून येत असून. गावात मोठ्या प्रमाणावर डुकरांमुळे दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते.

काही दिवसांपूर्वी गावातील महेंद्रसिंग पाटील व ईश्वर पाटील त्यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात डुकरांनी मोठ्या प्रमाणावर पिकांची नासधूस केल्याने संबधीतांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र तरीही डुकरांबाबत कुठलाच ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. डुकरांचा वाढता उपद्रवमुळे नागरिकांचा आरोग्यचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ह्या मोकाट डुकरांच्या त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी जोरदार होत आहे.

बातमीदारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

x
error: Content is protected !!