विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळेत मकर संक्रांत साजरी

जळगाव । प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघनगर येथे दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी संक्रांत हा सण ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. भौगोलिक, वैज्ञानिक दृष्टीने संक्रांत या सणाचे महत्व माहिती व्हिडीओ स्वरुपात देण्यात आली.

संक्रांति हा सण 14 जानेवारी लाच कसा येतो? त्याबरोबर सूर्याचे उत्तरायण, संक्रांतीला करावयाचे पदार्थ ,त्यामागची कारणे ही सर्व माहिती व्हिडीओ स्वरूपात विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.

कार्यक्रमाचे नियोजन सौ मीना मोहकर यांनी केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले त्याच बरोबर समन्वयीका वैशाली पाटील यांचेही अनमोल सहकार्य लाभले.

बातमीदारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

x
error: Content is protected !!