शनिवार दि. 15 रोजी गीतापाठ व प्रवचन

भुसावळ । प्रतिनिधी

जामनेर रोडलगत गजानन महाराज मंदिरासमोरील रामानंद नगर नगरात शनिवार, 15 जानेवारी 2022 रोजी गीतापाठ व प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.

द्वारकाबाई रामचंद्र सपकाळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ सकाळी 9 वाजता गीतापाठ होईल. यात हनुमान नगर गीतापाठ महिला मंडळ, रेल दुनिया गीतापाठ महिला मंडळ, मुक्ताई नगर गीतापाठ महिला मंडळ, सोमनाथ नगर गीतापाठ महिला मंडळ, चक्रधर नगर गीतापाठ महिला मंडळ, हिरा नगर गीतापाठ महिला भजनी मंडळ यांच्यासह दीपनगर, साकरी, फेकरी, खडका व यावल तालुक्यातील न्हावी येथील गीतापाठ महिला मंडळ सहभागी होणार आहे.

दुपारी २ वाजता हभप लक्ष्मण महाराज चिखलीकर यांचे प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व रात्री ८ वाजता भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उपस्थितीचे आवाहन गीतादास हभप चंद्रकांत महाराज साकरीकर, सुभद्राबाई सपकाळे, किर्ती सपकाळे, प्रणव व कृष्णा सपकाळे आदींनी केले आहे.

बातमीदारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

x
error: Content is protected !!