प्रियंका गांधी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

खामगांव । प्रतिनिधी

दि.12 जानेवारी 2022 रोजी कॉंग्रेस पक्ष कार्यालय येथे अ.भा.कॉंग्रेस कमिटीच्या महासचिव प्रियंकाजी गांधी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा उपस्थित होते.

खामगांव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार,शेगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले,महीला कॉंग्रेसच्या शहरअध्यक्षा सौ.सुरजितकौर सलुजा,उपाध्यक्षा सौ.मायाताई तिवारी,माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,हभप संगिताताई कानकिरड, सौ.स्मिता भोसले,सौ.भारती माळी,सौ.प्रमिला चोपडे,सौ.राधा मिरगे,भारती इंगोले,सुलोचना कळींगकर,कु.गायत्री भोसले,नगरसेवक इब्राहिम खॉ सुभान खॉं,ज्ञानेष्वर षेजोळे,गब्बरभाई,राजु पटेल यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

कॉंग्रेसनेत्या प्रियंका गांधी हया देशभरातील महिलांच्या हक्कासाठी लढा देत असून नारी शक्तीचा आवाज बुलंद करीत आहे. प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष उत्तुंग भरारी घेईल असे सांगुन मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी प्रियंका गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांना लाडु वाटप करुन वाढदिवसाच्या षुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रियंका गांधी संघर्श करो हम तुम्हारे साथ है, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

बातमीदारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

x
error: Content is protected !!