उत्तर महाराष्ट्र क्रिडा जळगांव

“भुसावळ रनर्सच्या महिला रनच्या प्रशिक्षणाला सुरुवात

भुसावळ प्रतिनिधी

येथे भुसावळ स्पोर्टस आणि रनर्स असोसिशन आयोजित ‘ बी सारा लेडीज ईकव्यालिटी रनच्या स्पर्धकांसाठी प्रशिक्षणाला सुरुवात झाली. शशिकला लाहोटी या नवोदित महिला धावपटूच्या हस्ते श्रीफळ वाढवून विधिवत प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली . याप्रसंगी समन्वयिका डॉ . निलिमा नेहेते,डॉ.चारुलता पाटील, प्रा.प्रविण फालक,सचिन अग्रवाल,सीमा पाटील,ब्रिजेश लाहोटी, सचिन मनवानी,नितिन पाटील,प्रवीण वारके,रणजीत खरारे, प्रवीण पाटील उपस्थित होते.
प्रथम महिला धावपटूंना वॉर्म अपचे महत्व सांगण्यात आले व त्यानंतर सर्वांनी वॉर्म अपला सुरुवात केली.त्यानंतर या नवोदित महिला धावपटूंना धावण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. धावण्याचे अंतर , वेग,श्वासोवास आदी गोष्टीत लक्ष देऊन हळू हळू धावायला सुरुवात झाली . यावेळी नविन धावपटूंचा उत्साह व आनंद वाखाणण्याजोगा होता , धावल्यानंतर योगशिक्षीका पूनम भंगाळे यांनी उपस्थित महिलांना स्ट्रेचिंगचे वेगवेगळे प्रकार शिकविले. अनेक वर्षांनी आपण भुसावळ रनर्सच्या सदस्यांसोबत सहज धावु शकलो व ही अतिशय आत्मविश्वास निर्माण करणारी गोष्ट आहे असे अनेक महिलांनी बोलून दाखविले. या प्रशिक्षणाला सरोज शुक्ला , पूनम कुलकर्णी,चारुलता अजय पाटील,कंगना मनवाणी,कांचन पाटील,स्वाती फालक,ज्याेस्ना पाटील,ममता ठाकूर,वेदश्री फालक,निशा गुमनानी,पूजा मोहनानी,क्रीपा मूलचंदानी,मयुरी आहुजा,यशोधरा शिरसाठ,भारती राठी,ज्योती पाटील,मीना नेरकर,चंचल भोळे आदी महिलांनी सहभाग नोंदविला.

error: Content is protected !!