उत्तर महाराष्ट्र जळगांव नोकरी

युवक काँग्रेसतर्फे ८ मार्चला जिल्हा स्तरीय वकृत्व स्पर्धा

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

बोदवड / प्रतिनिधी

महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या व जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दि.८ मार्च 2020 रोजी बेरोजगारी या विषयावर जिल्हा स्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील बोदवड येथे पत्रकार परिषदेत दिली. तरी या स्पर्धेत १८ ते ३५ वयोगटातील वक्ते, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश सुभाषराव पाटील यांनी केले आहे.
प्रभावी वक्तृत्व पुढे यावे व त्यांना युवक काँग्रेसच्या व्यासपीठावर काम करण्याची संधी मिळावी असा उद्देश समोर ठेवून युवक काँग्रेसने ‘युवा इंडिया के बोल’ या वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत बाबा खुप शिकला आणि घरीच असतो आता, हिंडतो दाही दिशांना प्रश्न माझ्या नोकरीचा, साहेबांना सांगा आम्हा बेरोजगारांचे तुम्ही काय करायचे ठरविले आहे 3 या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत https://bit.ly/SpeechonNRU?fbclid=IwAR0grRbiLQnNPm-hY7YrBI36qjMOm-94r_t05rZvn9N5d-i0fKdXo5l0Fm4 या गुगलच्या वेबसाईटवर आपल्या नावाची नोंदणी करावी
असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. सहभागी झालेल्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून स्पर्धेतील दोन विजेत्यांना राज्यस्तरावर सहभागाची संधी मिळणार आहे. स्पर्धेतील प्रथम,व्दितीय, तृतीय मानकरी यांना प्रत्येकी अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून स्पर्धेचे आयोजन दि.८ मार्च २०२० रोजी,सकाळी ११ वाजता विद्या प्रबोधनी, लेवा भवन समोर बीएसएनएल ऑफिस शेजारी जळगाव येथे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!