उत्तर महाराष्ट्र क्रिडा जळगांव शिक्षण

केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धात जि.प.उर्दु शाळा जामठी विजयी

बोदवड / प्रतिनिधी

बोदवड तालुक्यात ४ मार्चला संपन्न झालेल्या केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये जि.प.उर्दु शाळा जामठीचे विद्यार्थी विजयी ठरलेल्या, विजयी संघाचा जि.प.उर्दु शाळा येथील शाळा व्यवस्थापन समिती जामठी येथे, पालक, व शिक्षकांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सम्मानित करण्यात आले, यात जि.प उर्दु शाळाचे जामठी चे कबड्डी मोठा गट यानी कुऱ्हा संघाला १५-११ ने हरवले तसेच मुलींनी लंगडी मधिल मोठा गट मध्ये जिंकून प्रथम क्रमांक प्राप्त केले. तसेच लांब उडी, १०० मीटर धाव, मध्ये ही विद्यार्थ्यांने १ ला व २ रा क्रमांक प्राप्त केले. या सर्वांचा सत्कार करतांना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अब्दुल रहीम व सदस्य शहाबुद्दीन मुलतानी, सोबत मुख्याध्यापक अयाज़ मुकरी, शिक्षक शारिक ज़ुबैर शाह, बादशाह, अकलीम, अतहर, जामठी मराठी शाळेचे मुख्याध्यापक संजय राजपुत, शिक्षक वंजारी, माळी, तुपकर, उर्दु कन्या शाळेचे शिक्षक सादिक अहेमद, मज़हर शाह, उपस्थीत होते.

error: Content is protected !!