जळगांव नोकरी शिक्षण

एरंडोल येथे मेजर विनय पाटील यांचे व्याख्यान उत्साहात !


एरंडोल येथे मेजर विनय पाटील यांचे व्याख्यान उत्साहात !
एरंडोल प्रतिनिधी | कुंदन सिंह ठाकुर
एरंडोल : येथे न. पा.सभागृहात सैन्यात जम्मू येथे कार्यरत असलेले मेजर विनय पाटील यांच्या व्याख्यानाचा नागरीकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. बी. बोरनारकर हे होते.प्रास्ताविक व सुञसंचालन डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले. प्रशिक्षण काळात आलेले अनुभव व तरूण मुलांना सैन्यात भरती होणे विषयीचे मार्गदर्शन विनय पाटील यांनी केले.
यावेळी सेवानिवृत्त आर्मी जवान विजय महाजन,अनिल पाटील तसेच याप्रसंगी नगरसेवक कृणाल महाजन, नरेश डागा, बी. के.धुत,रघुनाथ कोठावदे आदी उपस्थित होते. विनय पाटील व त्यांचे वडील यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!