उत्तर महाराष्ट्र जळगांव नोकरी

जिल्ह्याधिकारींचे आदेश : होमगार्डसाठी आनंदाची बातमी

भुसावळ प्रतिनिधी राज्य सरकारने होमगार्ड यांना अचानक ड्युटीवरून काढून परिवारावर उपासमारीची वेळ आणली होती. पुन्हा ड्युटीवर घेण्यासाठी मोर्चेही काढण्यात आलेले होते.पण शेवटी म्हणतात “सब्र का फल मीठा होता है” आज ती वेळ आलेली असून मा.जिल्ह्याधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आदेश देऊन भुसावळात 25 होमगार्ड यांना दुपारी मॅसेज पाठवून रात्री 8 वाजेच्या आधी हजर होण्याचे आदेश जारी केले आहे.जो पर्यत कोरोना वायरसमुळे संचारबंदी (लॉकडाउन) सुरू राहणार तो पर्यत बाजारपेठ पोलीस स्टेशन 10 होमगार्ड, शहर पोलीस स्टेशन 10 होमगार्ड, तालुका पोलीस स्टेशन 5 होमगार्ड असे एकूण 25 होमगार्ड तिघही पोलीस स्टेशनला भुसावळात माननीय जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाने संचारबंदी (लॉकडाउन) उठे पर्यत होमगार्ड ड्युटीवर राहणार आहे.या दरम्यान होमगार्ड यांचा पगार मा.जिल्ह्याधिकारी देणार असल्याचा माहिती ड्युटी वर आलेल्या होमगार्ड यांनी दिली.या आदेशामुळे उर्वरित होमगार्ड मध्ये नवीन उम्मीद निर्माण झाली आहे.त्यांनाही आपले आदेश कधी येणार याकडे लक्ष लागून आहे.संचारबंदीच्या काळात हाताला काम नसलेल्या होमगार्ड यांना रोजगार उपलब्ध करून दिला म्हणून सर्वांनी जिल्ह्याधिकारी साहेबांचे आभार मानले.

error: Content is protected !!