अकोला राजकीय विदर्भ

दुष्काळात मदत न मिळाल्यास  राज्य अराजकतेकडे  वळेल – पृथ्वीराज चव्हाण

पत्रकार भवनात  मीट  द  प्रेस  कार्यक्रम
अकोला – केंद्र  शासनाने  गेल्या  साडेचार  वर्षात  शेतमालाचे हमीभाव  केवळ  तीन टक्के  वाढविले. देशभर शेतीमालाला भाव  नाहीत. याशिवाय  महाराष्ट्रात भीषण  दुष्काळ पडला आहे. दुष्काळात  शेतक:यांना  योग्य  ती  मदत  केल्या गेली  नाही  तर  स्थलांतर  होणार  आहे.  स्थलांतरामुळे  सामाजिक  समस्या निर्माण होतील व हे महाराष्ट्र  रा’य  आगामी काळात  अराजकतेकडे  जाईल.  असा गंभीर  इशारा रा’याचे  माजी  मुख्यमंत्री  पृथ्वीराज  चव्हाण  यांनी  दिला.  पृथ्वीराज  चव्हाण हे आज अकोला  जिल्हा पत्रकार  संघाने  आयोजीत केलेल्या मीट द प्रेस  कार्यक्रमात  बोलत होते.  स्थानिक  पत्रकार  भवनात झालेल्या  कार्यक्रमा’या व्यासपिठावर  यावेळी  मराठी  पत्रकार  परिषदेचे  अध्यक्ष  सिध्दार्थ  शर्मा, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शौकतअली  मिर साहेब, सरचिटणीस  प्रमोद  लाजुरकर  विराजमान होते.
काँग्रेस  नेते,  पंतप्रधान  कार्यालयाचे माजी  रा’यमंत्री,  माजी मुख्यमंत्री  व बौध्दीक  प्रज्ञावंत  पृथ्वीराज  चव्हाण यांनी आज मीट  द प्रेस  कार्यक्रमांतर्गत पत्रकार भवनात  पत्रकारांशी  दिलखुलास  चर्चा केली.
प्राथमिक  निवेदनात  पृथ्वीराज चव्हाण  म्हणाले की,  मोदी  सरकारने   २०२२  पर्यंत  शेतक:यांचे  उत्पन्न  दुप्पट  करण्याचे  आश्वासन दिले होते.  याशिवाय  स्वामीनाथन आयोगा’या  शिफारशीनुसार  शेतमालाला  दीडपट  हमीभाव  देण्याचे जाहीर केले  होते.  याशिवाय शेतक:यांचा  ७/१२  कोरा  करण्याचे  अभिवचन दिले  होते.  मोदी  सरकारने  ही प्रमुख तीनही आश्वासने  पाळली  नाहीत.  उलटपक्षी  शेतकरी  संप करु  शकत नाही,  अशी शक्यता गृहीत  ठेवत ग्राहकांना  खुश  करण्यासाठी  सातत्याने शेतमालाचे  भाव  पाडले आहेत.  शेतकरी  पूर्णपणे  नागविल्या गेला आहे.  त्यातच  रा’यात भिषण  दुष्काळ  पडला आहे.  रा’यशासन  दुष्काळाला  गांभिर्याने घ्यायला तयार नाही. काँग्रेस’या  कार्यकाळात  शेतमालाचे  हमीभाव दरवर्षी १९ टक्क्यांनी   वाढविल्या  जात होते. परंतु   या  सरकारने  हेतुपुरस्सपणे शेतमालाचे  भाव  पाडण्याचे  धोरण  ठेवले.  शेतमालाची  प्रचंड  आयात  करण्यात आली. रा’य  शासन मात्र  शेतमाला’या  भावासाठी  व्यापा:यांना  वेठीस धरते आहे.  हमीभाव  देण्यासाठी  व्यापा:यांना  तुरुंगात  पाठवणे  हा  वेडेपणा   असल्याचे  चव्हाण म्हणाले.  केंद्र  व रा’य  शासना’या  धोरणावर  टीका  करतांना  चव्हाण  यांनी राफेल  विमान खरेदी  प्रकरणाचा मुद्दा पुढे  रेटला. या मुद्द्यावर  बोलतांना चव्हाण म्हणाले की, राफेल खरेदी  प्रकरणात  ३० हजार कोटी  रुपयांचा  भ्रष्टाचार  झाला आहे. या उलट  ऑगस्टा वेस्टलॅड हेलीकॉप्टर   प्रकरणात  काहीच झाले नसतांना  भाजपाकडून  कांगावा  करण्यात येत आहे.  ऑगस्टा वेस्टलॅड  हेलीकॉप्टरची  खरेदी विक्री  झाली नाही.  व्यवहारच पूर्ण झाला नसून  हा व्यवहार  स्थगीत करण्यात  आला होता.  आगामी  लोकसभा  निवडणुकीचे  चित्र  सांगतांना  चव्हाण म्हणाले  की,  रा’यारा’यामध्ये समविचारी  पक्षांशी  आघाडी  करुन  काँग्रेस ही निवडणूक  लढणार आहे.  अशा आघाड्या होवू नयेत म्हणून  भाजपा  साम, दाम, दंड, भेद  वापरत आहेत.  केंद्र शासनाने  प्रसार माध्यमांना देखील  वेठीस धरले आहे.  विरोधात जाणारे  चॅनल अथवा  वृत्तपत्र  बंद  पाडण्यात येत आहेत.  मोदी सरकार’या  विरोधात  जाणा:या  पत्रकारां’या  नोक:यांवर  गदा आणण्यात येत आहे. महाराष्ट्रात होवू  घातलेल्या  आघाडीत प्रकाश आंबेडकर  यां’या  भारिप बहुजन महासंघाला सामावून  घेण्याचे  पूर्ण  प्रयत्न  सुरु  आहेत. काँग्रेस प्रतिसाद  देत नाही असे  आंबेडकर  खोटे  सांगत आहेत. आतापर्यंत  आघाडी येण्याविषयी  आंबेडकरांसोबत  वेगवेगळ्या काँग्रेस  नेत्यां’या  चार बैठकी झाल्याचे  पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
मीट  द प्रेस  कार्यक्रमापूर्वी  अकोला जिल्हा पत्रकार संघा’या वतीने  माजी  मुख्यमंत्री  पृथ्वीराज  चव्हाण यांचा शाल श्रीफळ व पुष्पगु’छ व  स्मृतिचिन्ह  देवून  यथोचित  सत्कार करण्यात आला.  मीट  द  प्रेस  कार्यक्रमाचे  प्रास्ताविक  सिध्दार्थ  शर्मा, संचलन प्रमोद  लाजुरकर  तर  आभार  प्रदर्शन  उमेश अलोने यांनी केले.  मीट  द  प्रेस  कार्यक्रमाला  इलेक्ट्रानीक  व  प्रींट  मिडीयाचे  जवळपास  ५० पत्रकार  उपस्थित होते. राष्ट्रगीताने  या कार्यक्रमाची  सांगता झाली.
3 Attachments

error: Content is protected !!