उत्तर महाराष्ट्र क्रिडा जळगांव

क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार जाहीर…

भडगाव / प्रतिनिधी

“जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक व क्रीडा गौरव पुरस्कार”

जळगाव जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघातर्फे देण्यात येणारे सन २०२० चे “जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक व क्रीडा गौरव पुरस्कार” आज जळगाव जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रदिप तळवेलकर व सचिव राजेश जाधव यांनी जाहिर केले प्रत्येक तालुक्यातून एक,जळगाव शहरातून एक व कनिष्ठ महाविद्यालय गटातून एक असे १७ जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार व दोन जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे,जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघातर्फे यासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते,त्यात भडगाव तालुक्यातून कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलीत,गो.पु.पाटील विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव येथील क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे यांची जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे,मागवलेल्या प्रस्तावाची छाननी जेष्ठ क्रीडाशिक्षक तथा मुख्याध्यापक दिलीपकुमार चौधरी (ए टी झांबरे विद्यालय), जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कार्थी प्रशांत जगताप (ला ना सार्वजनिक विद्यालय),राष्ट्रीय खेळाडू डॉ कांचन विसपुते (विवेकानंद प्रतिष्टान), आदर्श पर्यावरण शिक्षक किशोर पाटील (जिजामाता विद्यालय) आदर्श उपक्रमशील क्रीडाशिक्षका समिधा सोवनी (महाराणा प्रताप विद्यालय) यांच्या निवड समितीने करून पुरस्कार्थीची निवड केली.
बी.डी.साळुंखे यांच्या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,अव्वर सचिव प्रशांत पाटील,दुध फेडरेशन संचालिका पुनमताई पाटील,प्राचार्य आर.एस.पाटील तसेच संस्थेच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले आहे.सदर पुरस्काराचे वितरण सोहळ्याचे आयोजन पुढिल महिन्यात करण्यात येणार आहे असे जळगांव जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!