उत्तर महाराष्ट्र कृषी धुळे

‘विकेल ते पिकेल’ या धोरणावर मुख्यमंत्री साधणार शेतकऱ्यांशी संवाद

धुळे / जिमाका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध कृषी विषयक योजनांच्या संदर्भात गुरुवार दि. 10 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12 ते 1.30 या कालावधीत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी […]

आरोग्य उत्तर महाराष्ट्र धुळे

धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत 8 हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त !

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी पालन करावे : जिल्हाधिकारी संजय यादव धुळे / जिमाका धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूबाधित (COVID19) रुग्ण बरे होण्याचा दर 78 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून मृत्यू दर 2.92 टक्के एवढा आहे. जिल्ह्यातील एकूण 10 हजार 34 कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 8 हजार 31 रुग्ण कोरोना विषाणूमुक्त होवून आपापल्या घरी परतले आहेत. […]

उत्तर महाराष्ट्र धुळे

संजय गांधी निराधार योजनेतील 23,299 लाभार्थ्यांना सुमारे 1 कोटी 41 लाख 1 हजार 952 रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा.

प्रतिनिधी /शिंदखेडा – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार अब्दुल भाई सत्तार यांच्या आदेशाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या सुमारे 23 हजार 299 लाभार्थ्यांच्या खात्यात सुमारे एक कोटी 41 लाख […]

आरोग्य धुळे

पालकमंत्री या नात्याने सर्व जिल्हावासियांना नम्र आवाहन करतो की, आपणास जीवनावश्यक वस्तूंची कुठलीही कमतरता पडणार नाही.

*धुळे जिल्हावासियांनो,* कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर थैमान घालत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा. प्रधानमंत्री यांनी देशभर 21 दिवसांचा लाॅकडाऊन केला आहे. राज्यात या विषाणूचा संसर्ग वाढू नये. याकरिता मा. मुख्यमंत्री विविध महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. तर जिल्हा प्रशासन आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी या निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहे. याचा परिणाम म्हणून अद्यापपर्यंत आपल्या जिल्ह्यात एकही […]

आरोग्य धुळे

*धुळे जिल्ह्यात सापडला पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण*

*धुळे जिल्ह्यात सापडला पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण* साक्री येथील कोरोना संशयित 53 वर्षीय व्यक्तीला 8 एप्रिल, 2020 रोजी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. परंतु त्यांचा आज पहाटेपूर्वी 1.30 वाजता मृत्यू झाला आहे. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला असून […]

उत्तर महाराष्ट्र धुळे राजकीय

विधानपरिषद निवडणुक ; शेवटच्या दिवशी सात उमेदवारांचे तेरा अर्ज दाखल

धुळे / प्रतिनिधी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या धुळे – नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुक 2020 कार्यक्रम जाहिर झाला असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी सात उमेदवारांनी तेरा अर्ज दाखल केल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाधरण डी. यांनी कळविले आहे. यामध्ये अपक्ष म्हणून अमृत दलपत लोहार यांनी एक अर्ज, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अभिजित मोतीलाल पाटील यांनी […]

उत्तर महाराष्ट्र धुळे

धुळ्याच्या पोलिस अधीक्षकपदी चिन्मय पंडित

मुंबई / प्रतिनिधी आयपीएस अधिकार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्यांना सुरवात होण्यापुर्वीच मंगळवारी गृह विभागाने धुळे जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नागपूर शहरात पोलिस उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या एका आयपीएस अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे. तर जळगांव पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांची देखील लवकरच बदली होण्याचे संकेत मिळत आहेत. धुळयाचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे […]

उत्तर महाराष्ट्र धुळे राजकीय

ना. अब्दुल सत्तार आज धुळे जिल्हा दौऱ्यावर

धुळे / प्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार अ. नबी शुक्रवार दि.  31 जानेवारी 2020 रोजी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.  शुक्रवार दि. 31 जानेवारी 2020 रोजी दुपारी 3.30  वाजता शासकीय विश्रामगृह, धुळे येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता धुळे जिल्हा शांतता समितीची […]

उत्तर महाराष्ट्र धुळे विकास

अपघातप्रवण क्षेत्रात ट्रामा केअर सेंटर – उध्दव ठाकरे

 धुळे / प्रतिनिधी राज्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून अपघात प्रवण क्षेत्रात ट्रामा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य राहील. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.             धुळे जिल्ह्याची आढावा बैठक गुरुवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार […]

उत्तर महाराष्ट्र धुळे

धुळ्यामध्ये भारत बंदला हिंसक वळण

धुळे / प्रतिनिधी शहरात भारत बंदला हिंसक वळण लागलं आहे, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. आंदोलकांशी झालेल्या झटापटीत 2 पोलीस अधिकारी आणि 10 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. आंदोलकांनी दोन एसटीबसची देखील तोडफोड केली आहे. एवढंच नाही तर 2 मोटारसायकलीही जाळल्या आहेत. धुळे शहरात मागील […]

उत्तर महाराष्ट्र धुळे राजकीय

पोलिसांवर हल्ला करणार्‍या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करा – शिवसेना

धुळे / प्रतिनिधी पोलिसांवर आंदोलनाच्या माध्यमातून हल्ले करुन जनतेवर दहशत बसविणार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे.असे शिवसेनेचे महानगरप्रमुख संजय गुजराथी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आंदोलनाच्या माध्यमातून पोलिस प्रशासनासह सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणार्‍यांवर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल करायलाच हवा.पोलिसांना टार्गेट करुन जनजीवन प्रभावित करुन दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍या समाजकंटकांना वेळीच ठेचणे योग्य होईल.याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ […]

error: Content is protected !!